खासदार शेट्टी यांची मुख्यमंत्र्यांकडून समजूत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

मुंबई - पदापेक्षा अभिव्यक्‍तीस्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, असे सांगत खासदारकीचा राजीनामा देण्याची सकाळी तयारी दाखवणाऱ्या खासदार गोपाळ शेट्टी यांनी सायंकाळी विचार बदलला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढल्याने राजीनाम्याचा विचार बदलल्याचे शेट्टी यांनी सांगितले. 

स्वातंत्र्यलढ्यात ख्रिश्‍चनांच्या सहभागाविषयी वादग्रस्त विधान केल्यानंतर पक्षनेतृत्वाने शेट्टी यांना कानपिचक्‍या दिल्या होत्या, त्यामुळे ते नाराज होते. महापालिकेत भाजपकडून पहिले उपमहापौरपद मिळवणारे शेट्टी पक्षातील ज्येष्ठ सदस्य आहेत. "कोणत्याही पदापेक्षा मला व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. या स्वातंत्र्यावर गदा आणणारे पद मला नको. पक्षाने सांगण्याआधी राजीनाम्याची तयारी आहे. लवकरच माझा निर्णय जाहीर करेन,' असे नाराज असलेले शेट्टी म्हणाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी फोन केला. कॉंग्रेसच्या आरोपांचा आपण एकत्र सामना करू, त्यासाठी तुम्ही सोबत हवे आहात. त्यामुळे राजीनाम्याचा विचारही करू नका, अशी समजूत मुख्यमंत्र्यांनी काढल्याचे त्यांनी "सकाळ'ला सांगितले. मालवणी येथे शिया कब्रस्तान कमिटीच्या कार्यक्रमात स्वातंत्र्यलढ्यात हिंदू-मुस्लिम खांद्याला खांदा लावून लढले; मात्र ख्रिश्‍चनांचा यात सहभाग नव्हता, असे वक्तव्य त्यांनी केले होते. 

Web Title: MP Shetty considers Chief Minister