MPSCची परिक्षा ढकलली पुढे...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

राज्यातील पूरस्थिती पाहाता सरकारने 11 ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा (STI main paper) 2019 चा मुख्य पेपर क्रमांक 2 राज्यातील पुरपरिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे, रविवारी (ता. 11) सकाळी 10 वाजता घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे. याबाबत आयोगाने परिपत्रक जारी केले आहे.

राज्यातील पूरस्थिती पाहाता सरकारने 11 ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पूरग्रस्त भागाताली एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. 11 ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा आता 24 ऑगस्ट रोजी होणार आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आलेली आहे. महापुराची तीव्रता वाढीस लागली असताना बचाव कार्यानेही वेग घेतला आहे. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवणं याला सर्वोच्च प्राधान्य आहे. हे काम नौदल, लष्कर, एनडीआरएफ आणि कोस्टगार्ड यांच्यासह कोल्हापूरमधील अनेक नागरिक करत आहेत. राज्यातील पूरस्थिती पाहाता सरकारने 11 ऑगस्ट रोजी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर, सांगली सातारा आणि राज्यातील इतर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे, अनेक विद्यार्थ्यांनीही मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगकडे परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. अखेर त्यांची विनंती मान्य करण्यात आली असून लवकरच नवे हॉलतिकीट संकेतस्थळावर अपलोड केले जाईल. उमेदवाराने प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास आधी संबंधित परीक्षा केंद्रावर, तर परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधी परीक्षा कक्षातील स्वत:च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. तसेच परीक्षेला येताना मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून आवश्यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MPSC examination postponed due to floods letter issued