MPSC तर्फे 2017 मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

पुणे -  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक निश्चित करण्यात  आले आहे. हे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in  या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

पुणे -  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक निश्चित करण्यात  आले आहे. हे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in  या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते, त्यानुसार २०१७ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहेत.प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग, इतर लोकसेवा  आयोग, कर्मचारी आयोग, कर्मचारी चयन आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इ. कडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. आयोगाच्या व संबंधित संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाही व उमेदवारांचे नुकसान होणार नाही या दृष्टीने ही काळजी घेण्यात आली आहे. सर्व संस्थांना प्रस्तावित वेळापत्रकाची प्रत पाठवून या संदर्भात दक्षता घेण्याची विनंती करण्यात आली आहे. 

 स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक पुढीलप्रमाणे: तांत्रिक सहायक परीक्षा २०१६ ची जाहिरात ऑक्टोबर २०१६ मध्ये प्रसिद्ध केली जाणार असून मुख्य परीक्षेचा दिनांक १५ जानेवारी २०१७ आहे. विक्रीकर निरीक्षक परीक्षा २०१६ ची जाहिरात नोव्हेंबर २०१६ मध्ये प्रसिद्ध केली जाणार असून पूर्व परीक्षा दिनांक २९ जानेवारी २०१७ रोजी व मुख्य परीक्षा दिनांक २८  मे २०१७ रोजी घेतली जाणार आहे. याच प्रमाणे इतर परीक्षांच्या संभाव्य तारखा पुढीलप्रमाणे. 

राज्य सेवा परीक्षा २०१७ ची जाहिरात प्रसिद्धी डिसेंबर २०१६, पूर्व परीक्षा २ एप्रिल २०१७ व मुख्य परीक्षा दिनांक १६,१७व १८ सप्टेंबर २०१७ रोजी होणार आहे. पोलिस उप निरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१७ ची जाहिरात प्रसिद्धी जानेवारी २०१७, पूर्व परीक्षा १२ मार्च २०१७ व मुख्य परीक्षा ११ जून २०१७ या दिवशी होणार आहे. सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा २०१७ची  जाहिरात प्रसिद्धी जानेवारी २०१७ मध्ये पूर्व परीक्षा ३० एप्रिल  २०१७ व मुख्य परीक्षा ६ ऑगस्ट २०१७ ला होणार आहे. लिपिक नी टंकलेखक  परीक्षा २०१७, जाहिरात प्रसिद्धी फेब्रुवारी २०१७, पूर्व परीक्षा दि. १४ मे २०१७ व मुख्य परीक्षा ३ सप्टेंबर २०१७ या दिवशी होईल. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०१७ ची  जाहिरात प्रसिद्धी फेब्रुवारी २०१७, पूर्व परीक्षा २१ मे २०१७ व मुख्य परीक्षा ८ ऑक्टोबर २०१७ ला होणार आहे. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट - क - परीक्षा २०१७, जाहिरात प्रसिद्धी  फेब्रुवारी २०१७, पूर्व परीक्षा  २ जुलै २०१७ व मुख्य परीक्षा १५ ऑक्टोबर २०१७ होईल. महाराष्ट्र वन सेवा परीक्षा २०१७, जाहिरात प्रसिद्धी  मार्च २०१७, पूर्व परीक्षा ४ जून २०१७ व मुख्य परीक्षा २४ सप्टेंबर २०१७ या दिवशी होणार आहे. 

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०१७ ची  जाहिरात प्रसिद्धी  मार्च २०१७ मध्ये आणि  पूर्व परीक्षा ९ जुलै २०१७ रोजी होणार आहे . त्यातील  महाराष्ट्र यांत्रिकी व विद्युत अभियांत्रिकी सेवा  मुख्य परीक्षा दि. २६ नोव्हेंबर २०१७ यादिवशी होणार आहेत. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा दि. १७ डिसेंबर २०१७, व महाराष्ट्र विद्युत/ यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २४ डिसेंबर २०१७ या दिवशी होणार आहेत.
सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१७ ची  जाहिरात प्रसिद्धी  एप्रिल २०१७ व मुख्य परीक्षा २५ जून २०१७ या दिवशी घेणार आहे. सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलिस उप निरीक्षक पोलिस उपनिरीक्षक संयुक्त पूर्व परीक्षा २०१७ ची जाहिरात प्रसिद्धी  एप्रिल २०१७ मध्ये पूर्व परीक्षा १६ जुलै २०१७ रोजी तर  मुख्य परीक्षा पोलिस उपनिरीक्षकसाठी दि ५ नोव्हेंबर २०१७, सहायक कक्ष अधिकारी  १० डिसेंबर २०१७, विक्रीकर निरीक्षक पदासाठी ७ जानेवारी २०१८ या दिवशी घेण्यात येणार आहेत. 

कर सहायक परीक्षा २०१७ ची  जाहिरात प्रसिद्धी एप्रिल २०१७  मध्ये  पूर्व परीक्षा २०  ऑगस्ट  २०१७ व  मुख्य परीक्षा ३१  डिसेंबर २०१७, महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०१७ ची  जाहिरात प्रसिद्धी एप्रिल २०१७ मध्ये  पूर्व परीक्षा ३० जुलै २०१७ आणि मुख्य परीक्षा १७ डिसेंबर २०१७, विक्रीकर निरीक्षक  मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०१७ ची  जाहिरात प्रसिद्धी सप्टेंबर २०१७ मध्ये आणि मुख्य परीक्षा ५ नोव्हेंबर २०१७ या दिवशी होणार असल्याचे वेळापत्रकात नमूद करण्यात आले आहे.
 

Web Title: MPSC schedule for 2017 declared