#MPSC_STUDENTS_RIGHT मोहीम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

पुणे : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आपले प्रश्न सरकारपुढे मांडण्यासाठी #MPSC_STUDENTS_RIGHT मोहीम सुरू करणार आहेत. सोमवार  (18 जून) सकाळी 10 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 7 यावेळात  सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहचविण्याचा हा प्रयत्न आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली असून, शासनाच्या विविध खात्यांमध्ये तब्बल 2 लाख 38 हजार पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. त्याभरल्या जाणे अपेक्षित आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी अनेक आंदोलने, मोर्चे काढले होतो.

पुणे : स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आपले प्रश्न सरकारपुढे मांडण्यासाठी #MPSC_STUDENTS_RIGHT मोहीम सुरू करणार आहेत. सोमवार  (18 जून) सकाळी 10 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 7 यावेळात  सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपला आवाज सरकारपर्यंत पोहचविण्याचा हा प्रयत्न आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली असून, शासनाच्या विविध खात्यांमध्ये तब्बल 2 लाख 38 हजार पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. त्याभरल्या जाणे अपेक्षित आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांसाठी अनेक आंदोलने, मोर्चे काढले होतो. परंतु, शासनाने त्याची गांभिर्याने दखल घेतली नाही. यासाठी पुन्हा आपला आवाज शासनाच्या कानापर्यंत पोहचविण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. 

मागण्या...
शासनाच्या विविध खात्यांमध्ये तब्बल 2 लाख 38 हजार पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. त्या भरल्या जाव्यात या प्रमुख मागणीसह, सेवा निवृत्तीचे वय 55 करावे, कंत्राट पद्धतीने नोकर भरती करण्यात येऊ नये,  राज्य सेवेच्या 2018 च्या जाहिराती मध्ये पदसंख्येत वाढ करण्यात यावी, एमपीएसी ने 45 दिवसांच्या आत निकाल जाहिर करावेत आदी प्रकारच्या एकूण 14 मागण्यांसाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अनेक आंदोलने केली. पुणे ते मुंबई असा मार्चही काढला पण सरकारने त्याची दखल घेतली नाही. दोन लाखापेक्षा जास्त पदे रिक्त असूनही केवळ 69 जागांची जाहिरात शासनाने काढली होती. हा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील मोठा अन्याय आहे. याचीच जाणीव सरकारला व्हावी आणि त्यांच्यावर दबाव निर्माण व्हावा यासाठी आम्ही सोशल मिडीयाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी ही मोहीम सुरू करत आहोत. या मोहीमेसाठी आम्हाला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे.
महेश बडे - स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा विद्यार्थी  

Web Title: MPSC STUDENTS RIGHT campaign