वीज दरवाढीने ग्राहकांच्या खिशाला कात्री - चव्हाण 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

मुंबई - महावितरणने 20 ते 25 टक्‍के वीज दरवाढीचा निर्णय घेतल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा हा प्रकार असल्याची टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. 

मुंबई - महावितरणने 20 ते 25 टक्‍के वीज दरवाढीचा निर्णय घेतल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा हा प्रकार असल्याची टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. 

राज्यात 6.71 रुपये प्रतियुनिटचा दर आता 7.74 रुपये प्रतियुनिट होणार आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातले फडणवीस सरकार सतत नव्या धोरणांनुसार सामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लावत असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ही वीज दरवाढ योग्य असल्याचे महावितरणने स्पष्ट केले. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विजेचे दर समतुल्य असल्याचा खुलासा करताना नियमानुसारच वीज दरवाढीचा निर्णय घेतल्याचे महावितरणने सांगितले. 

Web Title: MSEB has decided to increase the power tariff by 20-25 percentage