महावितरणचे मीटर ऑनलाइन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

मुंबई  - ‘मीटर नाही’ हे कारण सांगून वीजजोडणी टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी महावितरणने सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in  या वेबसाईटद्वारे मीटर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही ग्राहकाला नवीन वीजजोडणी हवी असल्यास त्यासाठी लागणाऱ्या मीटरबाबतची सद्यस्थिती ते घरबसल्या महावितरणच्या वेबसाईटवर बघू शकतील. मीटरच्या पुरवठ्याबाबत व सद्यस्थितीबाबत ग्राहक या वेबसाईटला भेट देऊन खातरजमा करू शकतील.

मुंबई  - ‘मीटर नाही’ हे कारण सांगून वीजजोडणी टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी महावितरणने सर्व वर्गवारीतील ग्राहकांसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in  या वेबसाईटद्वारे मीटर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही ग्राहकाला नवीन वीजजोडणी हवी असल्यास त्यासाठी लागणाऱ्या मीटरबाबतची सद्यस्थिती ते घरबसल्या महावितरणच्या वेबसाईटवर बघू शकतील. मीटरच्या पुरवठ्याबाबत व सद्यस्थितीबाबत ग्राहक या वेबसाईटला भेट देऊन खातरजमा करू शकतील. नवी जोडणी, त्वरित जोडणी व मीटर बदलाबाबत ग्राहक टोल फ्री क्रमांक १८०० १०२ ३४३५ व १८०० २३३ ३४३५ वर संपर्क साधू शकतात. 

Web Title: MSEB meter online