'एमएसआरडीसी' बांधणार 1,621 कि.मी.चे रस्ते

Road
Road

मुंबई - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) राज्यात 1,621 किलोमीटरचे रस्ते बांधणार आहे. साडेपाच ते सहा हजार कोटींचे कर्ज असलेल्या "एमएसआरडीसी'ने काही दिवसांत केलेल्या चांगल्या कामांमुळे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी या कामाचे कंत्राट दिल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले.

समृद्धी महामार्ग, वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू, मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग, ठाणे- वाशी पुलाचा विस्तार अशा कामांचा धडाका "एमएसआरडीसी'ने लावला आहे, त्यामुळे केंद्र सरकारने राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची विविध कामे "एमएसआरडीसी'ला दिल्याची माहिती शिंदे यांनी वांद्रे येथे "एमएसआरडीसी' कार्यालयातील पत्रकार परिषदेत दिली. गडकरी यांनी राज्यात मंत्री असताना या महामंडळाची स्थापना केली होती. त्यानंतर मुंबई- पुणे एक्‍स्प्रेस-वे व अनेक उड्डाण पूल उभारण्यात आले होते.

"एमएसआरडीसी'चे काम मागील काही वर्षांत थंडावले होते. समृद्धी महामार्ग आणि वांद्रे- वर्सोवा सागरी सेतू आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे "एमएसआरडीसी'ला पुन्हा उभारी मिळत आहे, असे शिंदे यांनी सांगितले. वांद्रे येथील कार्यालयात कामाचा धावता आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासाठी "एमएसआरडीसी' राज्यात 1,621 किलोमीटरचे रस्ते बांधणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com