MSRTC : कामगिरी नसतानाही दिवसाचे वेतन मिळणार

एसटी महामंडळाने काढले परिपत्रक
MSRTC  Daily wages will paid even if there is no work st mumbai
MSRTC Daily wages will paid even if there is no work st mumbaiesakal

मुंबई : एसटीचे चालक, वाहक यांच्या नियोजित कर्तव्यावर असताना कोणत्याही कारणास्तव कामगिरी रद्द झाल्यास त्या दिवसाची हजेरी देण्याची मागणी मान्यताप्राप्त राज्य एसटी कामगार संघटनेने केली होती. त्यानुसार जे वेतनश्रेणीवर आहेत, त्यांना नियोजित कामगिरी द्यावी, तर रोजंदारीवर असलेल्या कामगारांना कामगिरीवर बोलविल्यानंतर त्यांना कामगिरी दिली नसल्यास त्या दिवसाची हजेरी देण्याची मागणी मान्य केल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

एसटी प्रशासनाने यासदंर्भात परिपत्रक काढले असून, यामध्ये विभाग नियंत्रकांना आदेश दिले आहे. विभागांतर्गत येणाऱ्या आगारातील फेऱ्याप्रमाणेच समय वेतनश्रेणी, तसेच रोजंदार चालक, चालक तथा वाहकांचा योग्य वापर करावा, वाहनांची उपलब्धता बघून वाहनाअभावी नियोजित कामगिरी रद्द होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. आगार व्यवस्थापकांनी फेऱ्या लावताना कायम वेतनश्रेणीवरील कर्मचा-यांस कामगिरी लावणे बंधनकारक असल्याचेही आदेश एसटी प्रशासनाने दिले आहे.

तुटपुंज्या वेतनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. कामगिरी मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांचे सुट्टीचे अर्ज घेऊन वेतनामध्ये कपात केली जात असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या, त्यानुसार प्रशासनाला मागणी केली असता, राज्य एसटी कामगार संघंटनेच्या लढ्याला यश आले आहे.

- संदीप शिंदे, अध्यक्ष, राज्य एसटी कामगार संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com