एसटीचालकांच्या  पगारातून दंडाची वसुली 

एसटीचालकांच्या  पगारातून दंडाची वसुली 

मुंबई - एसटीचालकांकडून वाहतुकीचे नियम मोडल्याने वाहतूक पोलिसांनी ई-चलानद्वारे दंड आकारला आहे. त्याची वसुली संबंधित चालकांच्या पगारातून करण्याचे आदेश एसटीच्या विभाग नियंत्रकांनी दिला आहे. मात्र या वसुलीचा राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेसचे (इंटक) अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी निषेध केला आहे. 

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यास वाहनचालकांना ई-चलानद्वारे दंड आकारला जातो. त्यासाठी रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. तसेच वाहतूक पोलिसांना अत्याधुनिक यंत्रेदेखील देण्यात आली आहेत. त्यानुसार वाहनचालकांवर कारवाई केली जाते. अशाच प्रकारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एसटीचालकांवरसुद्धा पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये परळ आगारातील 10, उरण आगारातील पाच बसचा समावेश आहे. तीन वर्षांमधील दंड भरण्याची नोटीस एसटी प्रशासनाला देण्यात आली आहे. त्या वेळी कर्तव्यावर असलेल्या चालकांच्या पगारातून या दंडाची कपात करण्याचे आदेश विभागीय नियंत्रकांनी दिला आहे. 

दंडाची रक्कम कामगारांच्या पगारातून कापणे म्हणजे हुकूमशाही आहे. आधीच कामगारांना पगार कमी, त्यात अशी वसुली अन्यायकारक आहे. प्रत्येक वेळी ई-चलान दिल्याने पगारातून दंडवसुली झाली तर कामगारांनी खायचे काय, असा अन्याय अजिबात सहन होणार नाही. 
- जयप्रकाश छाजेड, अध्यक्ष, राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेस (इंटक) 

चालकांकडून वसुली करून अन्याय केला जात आहे. एसटीमध्ये कामगारांना आपली बाजू मांडण्याची मुभा दिली जाते; मात्र वाहतूक पोलिसांनी दंड आकारायचा आणि त्याची कपात कामगारांच्या पगारातून करायची, याला संघटनेचा विरोध आहे. 
- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com