आवडेल तेथे प्रवास योजनेला मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

पुणे - एसटी महामंडळाच्या कामगारांनी गेल्या वर्षी चार दिवस संप केल्यामुळे त्या कालावधीत ज्या नागरिकांना ‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेअंतर्गत प्रवास करता आला नाही, त्यांच्यासाठी प्रशासनाने ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

‘आवडेल तेथे प्रवास’ योजनेअंतर्गत पास खरेदी केलेल्या नागरिकांना त्या कालावधीत प्रवास करता आला नाही. त्यासाठी गेल्या वर्षी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु, ही माहिती प्रवाशांना मिळाली नव्हती. प्रवाशांसाठी आता ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सासवडमधील दत्तात्रेय फडतरे या विद्यार्थ्याने त्यासाठी परिवहन मंत्री, एसटीचे अध्यक्ष आदींकडे पाठपुरावा केला होता. 

Web Title: MSRTC extension of the travel plan will be extended