एसटीच्या महाभरतीत "काटें की टक्कर!' 

एसटीच्या महाभरतीत "काटें की टक्कर!' 

मुंबई - एसटी महामंडळांतील विविध पदांसाठीच्या महाभरतीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद मिळाला आहे. विविध पदांसाठीच्या चौदा हजारांहून अधिक जागांसाठी सुमारे साडेतीन लाख उमेदवारांनी नोंदणी केली आहे. प्रत्येक जागेसाठी उमेदवारांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे. अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आल्यामुळे उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे. 
एसटी महामंडळांतील आतापर्यंतची सर्वांत मोठी भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पाच जानेवारीला जाहिरात प्रसिद्ध करत तांत्रिक व अन्य गटांतील 14 हजारांहून अधिक जागांसाठी महामंडळाने अर्ज मागवले होते. पहिल्या टप्प्यात तीन लाख 53 हजार उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यातील शुल्कासह अर्ज भरणारे 1 लाख 51 हजार उमेदवार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 फेब्रुवारी होती. पण महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिक उमेदवारांना अर्ज करता यावा, यासाठी महामंडळाने 11 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे अर्जांची संख्या आणखी वाढणार आहे. 

पद - अर्जांची संख्या 
1) लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ) - 1,11,486 
2) सहायक (कनिष्ठ) - 56,192 
3) सहायक वाहतूक अधीक्षक (कनिष्ठ) - 5,717 
4) वाहतूक निरीक्षक (कनिष्ठ) - 10,753 
5) लेखाकार (कनिष्ठ)/कनिष्ठ संग्रह पडताळक - 10,037 
6) भांडार पर्यवेक्षक (कनिष्ठ)/वरिष्ठ संग्रह पडताळक - 5,019 
7) भांडारपाल (कनिष्ठ) - 7,418 
8) सुरक्षा निरीक्षक (कनिष्ठ) 17,782 
9) सहायक सुरक्षा निरीक्षक (कनिष्ठ) - 17,727 
10) आगरक्षक (कनिष्ठ) - 3,156 
11) कनिष्ठ अभियंता- स्थापत्य (कनिष्ठ) - 7,759 
12) कनिष्ठ अभियंता- विद्युत (कनिष्ठ) - 4,105 
13) सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक (कनिष्ठ) - 7,410 
14) प्रभारक (कनिष्ठ) - 3,875 
15) वरिष्ठ संगणक चालक (कनिष्ठ) - 13,881 
16) चालक तथा वाहक (कनिष्ठ) - 50,776 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com