दुष्काळी जिल्ह्यांना लाल परीचा आधार

ST-Mahamandal
ST-Mahamandal

सोलापूर - राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढत असल्याने रोजगाराच्या शोधात अनेक जण स्थलांतर करीत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाकडून राज्यातील दुष्काळी जिल्ह्यांमधून चालक व वाहकांच्या चार हजार 416 जागा भरण्यात येणार आहेत.

चालक व वाहकांच्या भरतीमध्ये मराठा आरक्षण व केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केलेले 10 टक्‍के आर्थिक दुर्बल आरक्षणानुसार पात्र उमेदवारांसाठी पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. 16 जानेवारीपासून पात्र उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहेत. वाहक अथवा चालक पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षेतून निवड केली जाणार असल्याचेही महामंडळाकडून सांगण्यात आले. राज्यातील 12 दुष्काळी जिल्ह्यांसाठी पहिल्या टप्प्यात पदभरती काढण्यात आली आहे. दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्यांना आधार मिळेल, असा या भरतीचा उद्देश असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

जिल्हानिहाय पदांची संख्या
पुणे : 1,647
सोलापूर : 591
बुलडाणा : 472
धुळे : 268
औरंगाबाद : 240
जालना : 226
जळगाव : 223
अमरावती : 230
परभणी : 203
यवतमाळ : 171
नाशिक : 112
अकोला : 33

राज्यातील दुष्काळी भागांना मदत म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने साडेचार हजार वाहकांच्या जागा भरण्यात येत आहेत. त्यानंतर पुढील टप्प्यात उर्वरित जागा भरल्या जातील.
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com