"एसटी'त पुन्हा ठिणगी? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

मुंबई - अघोषित संपात सहभागी झाल्याचा ठपका ठेवत एसटी महामंडळाने एक हजार 10 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगार संघटनांच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी (ता. 25) मुंबईत होत आहे. 

मुंबई - अघोषित संपात सहभागी झाल्याचा ठपका ठेवत एसटी महामंडळाने एक हजार 10 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगार संघटनांच्या कोअर कमिटीची बैठक सोमवारी (ता. 25) मुंबईत होत आहे. 

महामंडळाने घोषित केलेली वेतनवाढ अपुरी असल्याचा दावा करीत एसटी कामगार 8 व 9 जून रोजी अघोषित संपावर गेले होते. त्यानंतर वेतनवाढीचे सूत्र कामगार संघटनांच्या म्हणण्यानुसार मान्य करण्यात आल्याने हा संप मागे घेण्यात आला. यादरम्यान झालेली निलंबनाची कारवाई मागे घेण्याची विनंती कामगार संघटनांनी केली असली, तरी व्यवस्थापन दाद द्यायला तयार नाही. त्यामुळे संघर्षाच्या पवित्र्यात असलेल्या संघटनांच्या कोअर कमिटीची ही बैठक मुंबई सेंट्रल येथे होत आहे. या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 

नऊ जून रोजी परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी आश्‍वासन दिले होते, की गंभीर गुन्हे वगळता आंदोलकांवर कुठलीही कारवाई होणार नाही; परंतु प्रशासनाकडून मात्र सेवासमाप्तीची कारवाई सुरू आहे. रोजंदारी गटातील कामगारांवर बडतर्फीची कुऱ्हाड चालवणे अत्यंत चुकीचे, बेकायदा आहे. 
- संदीप शिंदे, अध्यक्ष, मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे नेते 

Web Title: MSRTC ST employee strike meeting today