मुक्ताईच्या पादुका विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीकडे मार्गस्थ

मंगळवार, 30 जून 2020

संत मांदियाळी सर्वात लांबचा अंतरावर असलेल्या संत मुक्ताई यांच्या पादुका मुक्ताईनगरमधून पहाटे चार वाजता मार्गस्थ झाल्या. दरवर्षी हजारो वारकऱयांसमवेत तब्बल 33 दिवसांची वाटचाल करून हा पालखी सोहळा पंढरीत दाखल होत असतो.

मुक्ताईनगर : संत मांदियाळी सर्वात लांबचा अंतरावर असलेल्या संत मुक्ताई यांच्या पादुका मुक्ताईनगरमधून पहाटे चार वाजता मार्गस्थ झाल्या. दरवर्षी हजारो वारकऱयांसमवेत तब्बल 33 दिवसांची वाटचाल करून हा पालखी सोहळा पंढरीत दाखल होत असतो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 27 मे रोजी प्रस्थान होऊन सोहळा मुक्ताई मंदिरात मुक्कामी होता. त्या काळात वारीतील नैमित्यिक कार्यक्रम मंदिरात सुरू होते. आज पहाटे महापूजा होऊन चार वाजता केवळ वीस वारकऱयांसमवेत पादुका मार्गस्थ झाल्या.

मनाचिये वारी : पांडुरंगा, कशासाठी आमच्या पदरी झुरणीची वारी

wari 2020 : या वेळी संस्थानचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे, तहसीलदार श्याम वाडकर, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, पंजाबराव पाटील, नगराध्यक्षा नजमा तडवी, मनीषा पाटील, उद्धव जुणारे, विननायकराव हरणे, विशाल खोले, नितीन महाराज, ज्ञानेश्वर हरणे ज्ञानेश्वर जवळेकर महाराज, आदी उपस्थित होते. मुक्ताईंच्या पादुका वाखरीत येईल. तेथून त्या सकल संतांसमवेत पंढरीत प्रवेश करणार आहेत. हरिनामाच्या गजरात पादुका भल्या पहाटे अवघ्या वीस वारकऱय़ांसमवेत पंढरीकडे मार्गस्थ झाल्या.