#AareyForest प्रत्येक झाडं युतीचा एक आमदार पाडेल : आव्हाड

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 October 2019

आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी संध्याकाळी इलेक्ट्रिक कटरच्या आणि करवतींच्या सहाय्याने झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आल्यानंतर मोठा आवाज निर्माण झाल्याने स्थानिकांना घटनास्थळी धाव घेतली.

मुंबई : सत्तेतील एकाने सांगितले, की आरेतील वृक्ष तोडू देणार नाही. तर, दुसऱ्याने सांगितले की पाडणार. त्यानंतर हे दोन्ही सत्ताधारी काल एकत्र आले. मुंबईकरांनो याच्याविरोधात आवाज उठवा आणि सरकारला जाणीव झाली पाहिजे. प्रत्येक झाडं युतीचा एक आमदार पाडेल असे ठरविल्यानंतर या सरकारची हिंमत होणार नाही झाडे तोडण्याची, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

#AareyForest रात्रीत केली आरेतील 200 झाडांची कत्तल

आरेमधील प्रस्तावित मेट्रो कारशेडविरोधात पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी संध्याकाळी इलेक्ट्रिक कटरच्या आणि करवतींच्या सहाय्याने झाडे तोडण्यास सुरुवात करण्यात आल्यानंतर मोठा आवाज निर्माण झाल्याने स्थानिकांना घटनास्थळी धाव घेतली. तसेच ही माहिती वेगाने पसरल्याने पर्यावरणप्रेमींनी आरेमध्ये धाव घेत वृक्षतोड थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. आता पोलिसांनी येथे प्रवेशबंदी केली आहे. 

#AareyForest रात्रीच्या वृक्षतोडीनंतर आरेत प्रवेशबंदी 

न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मेट्रो प्रशासनाने आरेमधील वृक्षतोड तातडीने करण्यास सुरुवात केल्याने पर्यावरणप्रेमींचा संताप अनावर झाला आहे. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी झाडे तोडण्यास विरोध केला असून वृक्ष तोडीबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही. मुंबईला जिवंत ठेवणारा आरे बोरिवली नॅशनल पार्कचा भाग असून ही झाडे कापून मुंबईच्या प्रदूषणात वाढ़ करण्याचे पाप केल जाणार आहे. 

#AareyForest 'आरे'त वृक्षतोड करणाऱ्यांना 'पीओके'त पाठवा : आदित्य


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Aarey Forest NCP leader Jitendra Awhad targets government on tree cutting