
High Court : मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी आरडी धानुका; चार दिवस राहणार पदावर, नंतर सेवानिवृत्ती
मुंबईः न्यायमूर्ती रमेश धानुका यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली आहे. केंद्र सरकारने अधिसूचना जारी करुन त्यांची नियुक्ती जाहीर केली.
मात्र न्यायमूर्ती रमेश धनुका 30 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना मुख्य न्यायमूर्ती म्हणून 4 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. तोही सुट्टीचा कालावधी आहे.
संविधानाच्या अनुच्छेद २१७च्या खंड (१) द्वारा मिळालेल्या अधिकारांनुसार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रमेश देवकीनंदन धानुका यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे, असं अधिसूचनेमध्ये म्हटलं आहे.
सुप्रीम कोर्ट कॉलेजियमने १९ एप्रिल रोजी न्यायमूर्ती धानुका यांची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यासंबंधी शिफारस केली होती. धानुका यांना २३ जानेवारी २०१२ रोजी मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त केलं होतं.
आता ते ३० मे रोजी सेवानिवृत्त होत आहे. म्हणजेच केवळ चार दिवस ते हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश असतील. तोही सुट्टीचा कालावधी आहे. आज केंद्र सरकारने त्यांची नियुक्ती जाहीर केली.