
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणपट्टीतील जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रातही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, पूर्वेकडील गरम वाऱ्यांमुळे मुंबईसह या भागांतील तापमान 40 अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. राज्यभरात 11 मार्चपर्यंत हा उन्हाचा कडाका कायम राहील, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.