Maratha Reservation : विरोधी याचिकाकर्त्यांना हजर राहण्याचे निर्देश

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मराठा आरक्षण विरोधातील याचिकेवर सुनावणीसाठी आज न्यायालयात न्यायाधीश नरेश पाटील यांच्यासमोर अॅड. जयश्री पाटील यांनी या याचिकेचा उल्लेख केला. मात्र, याचिकेकर्ते गुणरत्न सदावर्ते यांचा उल्लेख ऑन रेकॉर्ड असल्यामुळे न्यायालयामध्ये बाजू मांडताना त्यांची उपस्थिती असणे बंधनकारक असल्याचे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. जयश्री पाटील या गुणवर्ते यांच्या पत्नी आहेत. 

मुंबई : महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेल्या 16 टक्के आरक्षणाच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीसाठी याचिकाकर्ते अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनाच न्यायालयात हजर रहावे लागेल असे निर्देश आज (बुधवार) न्यायालयाने दिले.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
मराठा आरक्षण विरोधातील याचिकेवर सुनावणीसाठी आज न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्यासमोर अॅड. जयश्री पाटील यांनी या याचिकेचा उल्लेख केला. मात्र, याचिकेकर्ते गुणरत्न सदावर्ते यांचा उल्लेख ऑन रेकॉर्ड असल्यामुळे न्यायालयामध्ये बाजू मांडताना त्यांची उपस्थिती असणे बंधनकारक असल्याचे न्यायाधीशांनी स्पष्ट केले. जयश्री पाटील या गुणवर्ते यांच्या पत्नी आहेत. 

न्यायालयाने त्यांच्या उल्लेखावर आक्षेप घेत आणि ऑन रेकॉर्ड असलेल्या याचिका दाराने न्यायालयात येऊन बाजू मांडावी. असे सांगितले. त्यामुळे आता दुपारच्या सत्रामध्ये अॅड. सदावर्ते येऊन याचिकेचा उल्लेख करतील अशी शक्यता आहे. त्यांना धमक्या येत असल्यामुळे ते उपस्थित नाहीत, असे पाटील यांनी सांगितले. मात्र, जी न्यायालयीन तरतूद आहे, त्यानुसार काम होणे आवश्यक आहे असे मुख्य न्यायमूर्तींनी सांगितले.

मराठा समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 16 टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सोमवारी याचिका दाखल करण्यात आली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह आंबेडकर अॅडव्होकेट असोसिएशन आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशनलीस्ट कॉन्सिलच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. यामुळे आता सरकारला मराठा आरक्षणासाठी न्यायालयात लढाई लढावी लागणार आहे.

Web Title: Mumbai High Court hearing against Maratha Reservation petition