न्यायमूर्ती धर्माधिकारी यांचा राजीनामा

वृत्तसंस्था
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

अपेक्षित काम झाले नसल्याने दु:ख

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. धर्माधिकारी यांच्या या निर्णयामुळे अनेक विषयांचा जाणकार आणि एक चांगला न्यायमूर्ती निवृत्त झाल्याची खंत न्यायालयीन वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे मुंबई सोडण्यास इच्छुक नाही, असे कारण त्यांनी राजीनामा पत्रात दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

धर्माधिकारी हे मुंबई उच्च न्यायालयातील दुसऱ्या क्रमांकाचे न्यायमूर्ती आहेत. त्यांच्या निवृत्तीला आणखी दोन वर्षे शिल्लक आहेत. मात्र, तत्पूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढती

धर्माधिकारी यांना इतर राज्यांतील उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून बढतीही देण्यात येत होती. मात्र, त्यांनी वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे आपण मुंबई सोडण्यास इच्छुक नाही. याच कारणास्तव आपल्याला इतर कोणत्याही राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणूनही बदली नको आहे, असे सांगितले. 

Image result for court

अपेक्षित काम झाले नसल्याने दु:ख

उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडून खूप अपेक्षा असतात. मात्र, अपेक्षित काम झाले नाही तर ते खूपच दु:खदायक असते. तसेच वयाच्या एका टप्प्यावर शरीर आणि कुटुंबाचे म्हणणेही ऐकावे लागते. ते ऐकले आणि राजीनाम्याचा निर्णय घेतला, अशा शब्दांत धर्माधिकारी यांनी आपली भावना व्यक्त केली.

Coronavirus : कोरोनाचा थैमान कायम; दीड हजार रुग्णांचा मृत्यू


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai High Court Judge Satyaranjan Dharmadhikari Resigns their Post