'न्यायालयांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा अस्तित्वात आहे का?'

सुनिता महामुनकर
सोमवार, 15 मे 2017

मुंबई: राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा अस्तित्वात आहे का? याचे ऑडिट चालू वर्षभरात करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने आज (सोमवार) दिले आहेत.

न्यायालयांमध्ये हजारो कागदपत्रे आणि पुराव्याच्या नोंदी असतात, त्यासाठी ग्राहक न्यायालयासह सर्व न्यायालयांचे ऑडिट करा, असे आदेश न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने दिले. न्यायालयांमधील सुविधांबाबत दिलेल्या निकालपत्रात आगीसह, ई-कोर्ट, सुरक्षा आदींबाबत सार्वजनिक बांधकामविभागाला आदेश दिले आहेत. आतापर्यंत केवळ 403 न्यायालयांचे ऑडिट सरकारने केले आहे.

Web Title: mumbai high court order government audit to fire in the court