बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

‘राज्य सरकारनं यासंदर्भात अधिसूचना काढली असली तरी जोपर्यंत बैलगाडी स्पर्धांदरम्यान बैलांना इजा न होणार नाही याविषयी सरकार नियमावली बनवत नाहीत आणि आमच्यासमोर सादर करून आम्ही परवानगी देत नाही. तोपर्यंत बैलगाडी स्पर्धांना परवानगी नाही.’ असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

मुंबई : यंदाही राज्यात बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे यंदा राज्यात कोठेही बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाची परवानगी देण्यास मनाई करण्यात आली आहे.

‘राज्य सरकारनं यासंदर्भात अधिसूचना काढली असली तरी जोपर्यंत बैलगाडी स्पर्धांदरम्यान बैलांना इजा न होणार नाही याविषयी सरकार नियमावली बनवत नाहीत आणि आमच्यासमोर सादर करून आम्ही परवानगी देत नाही. तोपर्यंत बैलगाडी स्पर्धांना परवानगी नाही.’ असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

न्यायालयाने या संदर्भात दोन आठवड्यांत राज्य सरकारला यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. याविषयी सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Mumbai High Court refuses to allow bullock cart race