...तर निवासी डॉक्टरांनी नोकरी सोडून द्यावी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

मुंबई- डॉक्टरांना मारहाणीची भिती वाटत असेल तर निवासी डॉक्टरांनी नोकरी सोडून द्यावी, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने संपावर असलेल्या डॉक्टरांना आज (मंगळवार) फटकारले.

राज्यातील 14 वैद्यकीय महाविद्यालयांतील सुमारे साडेचार हजार निवासी डॉक्‍टर बेमुदत रजेवर गेले आहेत. मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात निवासी डॉक्‍टरला व धुळे येथील डॉक्टरला झालेल्या मारहाणीनंतर राज्यभरातील डॉक्टरांनी सुरक्षेच्या मुद्यावरून बंद पुकारला आहे. यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

निवासी डॉक्टरांच्या सामुहिक रजेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने डॉक्टरांना फटकारताना म्हटले की, 'एखाद्या कामगाराप्रमाणे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जर डॉक्टर संपाचे हत्यार उपसत असेल तर त्यांचे वर्तन हे डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारे आहे. सामूहिक रजेवर जाण्याचा डॉक्टरांचा अधिकार आहे. परंतु अशाप्रकारे रुग्णांना वेठीस धरुन मागण्या पूर्ण करुन घेणे चुकीचे आहे. मारहाणीची भिती वाटत असेल तर निवासी डॉक्टरांनी नोकरी सोडून द्यावी.'

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने मार्डला प्रतिज्ञापत्र सादर करुन भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे याचिकेवरील सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

Web Title: mumbai high court slams agitator doctors