esakal | कंटेनमेंट झोनमधील अडचणी कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश... 

बोलून बातमी शोधा

null

गर्दी टाळण्यासाठी दुकानदारांनी WhatsApp नंबर द्यावा - हायकोर्ट

कंटेनमेंट झोनमधील अडचणी कमी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश... 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कंटेनमेंट झोनमध्ये केल्या जाणाऱ्या लॉकडाऊनमुळे रहिवाशांना कोणत्याही अडचणी सहन कराव्या लागू नये यासाठी जीवनावश्यक वस्तू पुरविणाऱ्या त्या भागातील दुकानदारांचे WhatsApp नंबर्स प्रसिद्ध करावे, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाने स्थानिक प्रशासनाला केली आहे.

औरंगाबादमध्ये कंटेनमेंट झोन मध्ये पाच ते सात दिवसांचा कडेकोट लौकडाऊन लावला जातो, त्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशी तक्रार करणारी याचिका औरंगाबाद हायकोर्टमध्ये करण्यात आली आहे. याचिकेवर न्या. प्रसन्ना वारले आणि न्या श्रीकांत कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे व्हिडीओ कौन्फरन्सिंगमध्ये नुकतीच सुनावणी झाली.

मोठी बातमी - बापरे ! काळा धूर आणि प्रचंड दुर्गंधी; दादरकर म्हणतायत आता बास, नाहीतर...

अशा विशिष्ट भागातील दुकानदारांचे WhatsApp क्रमांक ठळकपणे निर्देशित करावे ज्यामुळे नागरिकांना घरपोच सामान मिळेल आणि विशेष गर्दीही होणार नाही, अशी सूचना खंडपीठाने केली आहे.

दुकानदारांनी धान्याच्या वेगवेगळ्या प्रमाणात पाकिटे तयार करावी जेणेकरून नागरिकांना खरेदी करताना त्रास होणार नाही. तसेच जबाबदार अधिकार्यांचे क्रमांकही जाहीर करावे, असेही न्यायालयाने सुचविले आहे.

प्रशासन याबाबत योग्य ती कार्यवाही करत आहे. मात्र अपवादात्मक परिस्थिती असल्यामुळे न्यायालय सूचना करीत आहे, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.

mumbai high courts aurangabad bench gave important orders regarding contentment zones