esakal | Mumbai: नवीन गैरव्यवहार बाहेर काढणार : किरीट सोमय्या
sakal

बोलून बातमी शोधा

किरीट सोमय्या

नवीन गैरव्यवहार बाहेर काढणार : किरीट सोमय्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, साखर कारखाने आणि निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाचे छापे पडलेले असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रविवारी नवा इशारा दिला. अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

सोमय्या म्हणाले, की जरंडेश्वर कारखान्याचा मालक कोण आहे, असा माझा अजित पवार यांना प्रश्न आहे. माझ्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत तोपर्यंत मी पवारांना प्रश्न विचारत राहणार. त्यांच्यात या प्रश्नांची उत्तरे देण्याची हिंमत असेल, अशी आशा करतो. बुधवारी मी पुण्यात अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची आणखी एक पोलखोल करणार आहे.

हेही वाचा: काश्‍मीरमध्ये मोठी कारवाई; दहशतवाद्यांशी संबंधित 900 जण ताब्यात

यांनी इतके गैरव्यवहार केले आहेत, इतकी लूट केली आहे की मोजदाद करणे अवघड आहे, असेही त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, की अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर चार दिवसांपासून छापे सुरू आहेत. हा पाच हजार कोटींपेक्षा मोठा गैरव्यवहार आहे. त्यांना तुरुंगात जावेच लागेल. आपल्यावर कारवाई होईल, असे महाविकास आघाडला स्वप्नातही वाटले नसेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते करून दाखविले, असा दावाही सोमय्या यांनी केला.

अजित पवार, हसन मुश्रीफ, किशोरी पेडणेकर आणि नवाब मलिक यांच्यावर मी भ्रष्टाचाराचे आरोप केले. पण मी दिलेले पुरावे खोटे आहेत, हे सांगण्याची एकाचीही हिंमत झाली नाही.

- किरीट सोमय्या, भाजप नेते

loading image
go to top