mumbai Local: सीएसएमटी ते पनवेल मार्गावर दोन्ही बाजूंची लोकल वाहतूक पाच तास बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Local

Mumbai Local: सीएसएमटी ते पनवेल मार्गावर दोन्ही बाजूंची लोकल वाहतूक पाच तास बंद

मुंबईत लोकलच्या तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रुळांची दुरूस्ती, सिग्नल यंत्रणांच्या तांत्रिक कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, सीएसएमटी ते पनवेल दरम्यानची वाहतूक पाच तास बंद राहणार आहे. त्यामुळे सुट्टी दिवशी लोकल प्रवाशांना बाहेर पडताना काळजी घ्यावी लागणार आहे. (mumbai Local Mega Block central harbor and western railway line panvel csmt )

मिळालेल्या माहितीनुसार, काळी साडे दहा ते दुपारी साडे तीनपर्यंत सीएसएमटीहून पनवेलसाठी एकही लोकल सुटणार नाही. मात्र पनवेल ते वाशी, आणि सीएसएमटी ते कुर्ला अशा विशेष लोकल चालवल्या जातील.

देखभालीचे काम, रुळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी आणि सिग्नल यंत्रणेतील विविध कामासाठी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा मध्य , पश्चिम आणि हार्बरच्या लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

देखभालीचे काम, रुळांच्या दुरुस्तीच्या कामासाठी आणि सिग्नल यंत्रणेतील विविध कामासाठी रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचा मध्य , पश्चिम आणि हार्बरच्या लोकल वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

प्रवाशांना ठाणे-वाशी मार्गावरून प्रवास करण्याची मुभा असेल. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणे दरम्यान फास्ट मार्गावर दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत.

त्यामुळे अप आणि डाऊन मार्गांवरील फास्ट लोकल स्लो मार्गावरून वळवण्यात येतील. पश्चिम रेल्वेवर बोरिवली आणि जोगेश्वरी दरम्यान पाचव्या ट्रॅकवर ब्लॉक असेल, त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.30 ते दुपारी 2.45 या वेळेत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या त्यांच्या शेड्यूल थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांदरम्यान थांबतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 10मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

कल्याण येथून सकाळी 10.28 ते दुपारी 3.25 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या त्यांच्या वेळापत्रकाच्या थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.