वैद्यकीय सेवेसाठी मोबाईल "ऍप'

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 मे 2017

मुंबई - अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवेच्या मोबाईल "ऍप'चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. "गोल्डन हवर सिस्टीम्स प्रा.लि.' या कंपनीने बनविलेले Ambulance.run हे आपत्कालीन वैद्यकीय सेवेशी संबधित "ऍप' आहे. या "ऍप'द्वारे वापरकर्ता आपत्कालीन स्थितीमध्ये स्मार्ट फोनच्या मदतीने रुग्णसेवेचे आरक्षण करू शकतात.

आपल्या जवळील रुग्णवाहिका शोधण्यासाठी, आरक्षण करण्यासाठी आणि सद्यःस्थिती जाणून घेण्यासाठी हे "ऍप' साह्य करेल. "गोल्डन हवर सिस्टीम्स' ही औद्योगिक नीती तथा संवर्धन विभागाअंतर्गत मान्यताप्राप्त स्टार्ट अप इंडिया, स्टॅंड अप इंडिया प्रोग्रामद्वारे आणि नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून शिफारस केलेली कंपनी आहे. या "ऍप' 250 हून अधिक रुग्णवाहिकाचालक त्याचबरोबर 360 हून अधिक रुग्णवाहिकांबरोबर कार्यन्वित आहे. या वेळी आमदार नरेंद्र पवार, "ऍम्ब्युलन्स डॉट रन'चे संचालक हेमंत ठाकरे उपस्थित होते.

Web Title: mumbai maharashtra mobile app for medical service