एनडीए आघाडीत जाणार नारायण राणेंचा नवा पक्ष?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 सप्टेंबर 2017

मुंबई - कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले नारायण राणे यांना भाजपमध्ये सामावून घेण्याऐवजी त्यांना मंत्रिमंडळात आघाडी म्हणून सामावले जाणार असल्याचे समजते.

सदाभाऊ खोत, महादेव जानकर यांच्याप्रमाणे नारायण राणे यांनी नव्याने स्थापन केलेली आघाडी "एनडीए'त सामील होणार असल्याचे समजते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्याहून भारतात परतल्यानंतर महाराष्ट्रात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यात नारायण राणे यांना स्थान दिले जाईल. मात्र, राणे यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यास शिवसेनेची प्रतिक्रिया काय होईल याचा अंदाज नाही. शिवाय राणे यांच्यावरील काही आरोप लक्षात घेता त्यांना भाजपमध्ये सामावून घेणे योग्य ठरणार नाही, असे काहींचे मत आहे. त्यामुळे हा आघाडीचा मार्ग सुचवण्यात आला आहे.

शिवसेना या निर्णयानंतर काय करेल याचा अंदाज भाजपला अद्याप आलेला नाही. मात्र, शिवसेनेची भूमिका तुटेस्तोवर ताणण्याची नसेल असे एका ज्येष्ठ भाजप नेत्याचे मत आहे. शिवाय पंतप्रधानांच्या विरोधात रस्त्यावर उतरणाऱ्या पक्षाला किती सांभाळून घ्यायचे, हा प्रश्‍नही आहे. राणे यांच्या भाजप प्रवेशाचा कोणताही राजकीय लाभ भाजपला होणार नाही, असे मतही व्यक्‍त केले जाते आहे.

Web Title: mumbai maharashtra narayan rane new party