राज्यात आणखी 21 पासपोर्ट सेवा केंद्रे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

मुंबई - राज्यात लवकरच आणखी 21 शहरांमध्ये पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू होणार आहेत. टपाल कार्यालयांत ही सुविधा उपलब्ध होईल.

मुंबई - राज्यात लवकरच आणखी 21 शहरांमध्ये पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू होणार आहेत. टपाल कार्यालयांत ही सुविधा उपलब्ध होईल.

राज्यात सध्या कोल्हापूर, औरंगाबाद, पिंपरी, वर्धा, विक्रोळी, सांगली येथील टपाल कार्यालयांत पासपोर्ट सेवा केंद्रे आहेत. पोस्टाच्या महाराष्ट्र सर्कलने प्रस्तावित केल्याप्रमाणे बीड, जळगाव, नगर, पंढरपूर, जालना, लातूर, नांदेड, अलिबाग, नरिमन पॉईंट व गोवा (दक्षिण) आदी ठिकाणी ही केंद्रे सुरू होतील. या केंद्रांवर नवीन पासपोर्ट नोंदणीची आणि नूतनीकरणाची सुविधा उपलब्ध होईल; पण तत्काळ पासपोर्टची सुविधा नसेल.

Web Title: mumbai maharashtra news 21 passport service center in state