राज्यात मंजूर प्रकल्पांपैकी निम्मेच सुरू

राज्यात मंजूर प्रकल्पांपैकी निम्मेच सुरू

मंजूर औद्योगिक प्रस्तावांत महाराष्ट्र, तर गुंतवणुकीत गुजरात अव्वल
मुंबई - केंद्र सरकारने देशात उद्योगवाढीला चालना देण्यासाठी "मेक इन इंडिया' कार्यक्रमांतर्गत उद्योग सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या 20 वर आणली आहे, तसेच उद्योग प्रस्तावांच्या मंजुरीचा सपाटा लावला आहे. मात्र, मंजुरी मिळालेल्या प्रकल्पांपैकी निम्मे सुरू झाल्याची माहिती उघड झाली आहे. 19 हजार 437 मंजूर प्रकल्पांपैकी केवळ आठ हजार 664 प्रकल्पच सुरू झाले आहेत.

प्रस्तावित 11 लाख 37 हजार 783 कोटींपैकी अवघी दोन लाख 69 हजार 814 कोटींची प्रत्यक्ष गुंतवणूक झाली आहे. गुजरातमध्ये 13 हजार 308 मंजूर प्रकल्पांतून 14 लाख 36 हजार 963 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे.

उद्योजकांना सर्व परवाने एकाच ठिकाणी ऑनलाइन मिळावेत व उद्योगांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गुंतवणूक साह्य केंद्र (मैत्री) स्थापन केले आहे. या केंद्राने फेब्रुवारी 2017 पर्यंत 393 प्रकल्प हाताळले. "मैत्री' केंद्राकडे आलेल्या 740 तक्रारींपैकी 637 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. ऑगस्ट 1991 ते नोव्हेंबर 2016 या कालावधीत माहिती-तंत्रज्ञान उद्योगासाठी 473 प्रस्ताव मिळाले आहेत. त्यातील गुंतवणूक सर्वाधिक तीन कोटी 87 लाख 433 कोटी आहे. ती एकूण गुंतवणुकीच्या 34.1 टक्के आहे. त्यापाठोपाठ इंधन आणि धातू उद्योगांत अनुक्रमे एक कोटी 42 लाख 760 (12.5 टक्के) आणि एक कोटी एक लाख 354 (8.9 टक्के) गुंतवणूक आहे. एकूण मंजूर गुंतवणूकीपैकी सुमारे 55.5 टक्‍के गुंतवणूक या तीन उद्योग गटांत आहे.

उद्योग प्रकल्पांची सद्यःस्थिती (ऑगस्ट 1991 ते नोव्हेंबर 2016)
उद्योग गट मंजूर प्रस्ताव कार्यान्वित प्रकल्प
संख्या गुंतवणूक (कोटी रुपये) संख्या गुंतवणूक (कोटी रुपये)


माहिती व तंत्रज्ञान 476 3,87,433 289 58,322
इंधन 826 1,42,760 202 28,147
धातू 1,919 1,09,354 948 37,055
रसायने व खते 2,859 61,227 1,397 22,709
वस्त्रोद्योग 2,012 50,590 958 17,169
साखर 1,559 39,013 247 8,602
परिवहन 421 32,149 285 24,554
फोटोग्राफिक फिल्म्स व कागद 981 28,419 570 13,988
सिमेंट जिप्सम 373 25,456 150 5,726
औद्योगिक यंत्रसामग्री 851 24,204 509 8,802
विद्युत व इलेक्‍ट्रॉनिक्‍स 1,181 22,633 687 7,978
प्रक्रिया केलेले अन्न 1,057 20,515 447 5,868
वनस्पती तेल व वनस्पती 374 16,108 204 2,350
औषधी 589 16,080 499 4,386
कागद व कागद उत्पादने 556 17,112 281 7,970
अभियांत्रिकी 363 13,681 206 4,622
यंत्रसामग्री, सिरॅमिक, संकीर्णउद्योग 466 8,221 291 4,422
इतर 2,312 1,30,828 497 7,144
एकूण 19,437 11,37,783 8,664 2,69,814

निवडक राज्यांसाठी मंजूर औद्योगिक प्रस्ताव
तपशील महाराष्ट्र गुजरात तमिळनाडू आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश देशभरात
प्रस्ताव (संख्या) 19,437 13,308 9,520 8,814 8,267 1,08,310
गुंतवणूक (रु. कोटी)11,37,783 14,36,963 5,38,622 9,96,834 3,41,826 1,14,10,426

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com