‘समृद्धी’साठी आठ हजार कोटी - मुख्यमंत्री फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 28 जानेवारी 2018

मुंबई - मुंबई आणि नागपूर शहरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी समृध्दी महामार्गासाठी राष्ट्रियीकृत बॅंका आठ हजार कोटी रुपयांचा निधी उभारणार आहेत. या प्रकल्पासाठी लागणारी ६० टक्‍के जमीन सहमतीचे नवे तत्व अंगीकारून अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भारतातील महत्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पातील अर्धे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू असल्याची माहिती दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत बोलताना फडणवीस यांनी दिली. 

दावोस येथे झालेल्या विविध परिषदांची माहिती ‘सकाळ’ला देताना मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव प्रविणीसिंह परदेशी म्हणाले, की भारतातील नवे प्रकल्प हा दावोस येथे उत्सुकतेचा विषय होता. त्यातील तब्बल ५० टक्‍के प्रकल्प महाराष्ट्रात राबवले जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबई आणि नागपूर या दोन ठिकाणांना जोडणारा समृध्दी महामार्ग आता बांधकाम सुरू करण्याच्या स्थितीत आला आहे. जमिन अधिग्रहीत करण्यासाठी होणारे कोर्टकज्जे प्रकल्पात बाधा ठरतात. ते टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या बांधकामासाठी संपूर्णत: वेगळा मार्ग अवलंबला आहे. प्रकल्पासाठी जमिनधारकांची सहमती घेत जागा विकत घेण्याचा पायंडा या निमित्ताने पडला आहे. निती आयोगाचे सचिव अमिताभ कांत यांनाही या नव्या रूपरेषेची माहिती देण्यात आली. ‘फिन्टेक’ने महाराष्ट्रातील व्यापार व्यवहार पूर्णत: बदलला जाणार आहे. या नव्या प्रणालीची सविस्तर माहिती दावोस येथे सादर करण्यात आली.

‘बॉलिवूड’चा सर्वाधिक फायदा
जागतिक व्यापार परिषदेने मुंबईत औद्योगिक केंद्र उभारण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे शेती, माहिती तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा अनेक विषयांत लाभ होणार आहे. ‘बॉलिवूड’ला याचा सर्वाधिक फायदा होणार असल्याचे परदेशी यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, डिजिटल ग्राफिक्‍स, गेमिंग,  ‘३-डी’ अशा सिनेनिर्मितीतील महत्त्वाच्या बाबींमध्ये भारतीय तंत्रज्ञ आघाडीवर आहेत. पण त्यासंबंधीच्या सोयीसुविधा भारतातील स्टुडिओत नसल्याने ही मंडळी अमेरिकत जात असत. आता औद्योगिक केंद्र येथे उभारण्यात येणार असल्याने निर्मितीची सर्व कामे महाराष्ट्रात होऊ शकतील. चित्रपटनिर्मिती क्षेत्राला आणि विशेषत: ‘बॉलिवूड’ला याचा लाभ होईल. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिनेता शाहरूख खान यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला संबोधितही केले.

Web Title: mumbai maharashtra news 8000 crore to samruddhi highway