अमित शहांच्या दौऱ्यात शक्तीप्रदर्शनासाठी हजार रूपये

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 जून 2017

मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येत्या 16 जून पासून मुंबई दौऱ्यावर आहेत. या दरम्यान शक्‍तीप्रदर्शन करण्यासाठी प्रत्येक मोटारसायकस्वाराला एक हजार रूपयांचा मेहनताना देण्यात येणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली.

मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येत्या 16 जून पासून मुंबई दौऱ्यावर आहेत. या दरम्यान शक्‍तीप्रदर्शन करण्यासाठी प्रत्येक मोटारसायकस्वाराला एक हजार रूपयांचा मेहनताना देण्यात येणार असल्याची खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली.

शहा 16 ते 18 जून या कालावधीत मुंबईत असतील. या यादरम्यान राज्यभरातील पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार असून राज्यातील पक्षाच्या कामगिरीची आढावा घेणार आहे. दक्षिण मुंबईतील गरवारे क्‍लब येथे पदाधिकाऱ्यांशी शहा संवाद साधतील. "सह्याद्री' या शासकीय अतिथिग्रहात पक्षाचे आमदार-खासदार तर मुख्यमंत्र्यांच्या "वर्षा' निवासस्थानी भाजप मंत्र्यांसोबत ते चर्चा करणार आहेत. यासाठी तीन दिवस भाजपच्या मंत्र्यांनी मुंबई न सोडण्याचा आदेश पक्षाने दिला आहे.

दरम्यान, शहा यांचे मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतर शक्‍तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. विमानतळ ते दादरच्या वसंत स्मृती कार्यालयापर्यंत मोटारसायकल फेरी काढण्यात येणार असून त्याची जबाबदारी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या एका नेत्यावर सोपविण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक मोटारसायकलस्वाराला दिड ते दोन तासांच्या फेरीसाठी एक हजार रूपयांचा मेहनताना देण्यात येणार आहे. फेरीत कमीत कमी दहा हजार मोटारसायकलींचा समावेश करण्यासाठी या नेत्याने कंबर कसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: mumbai maharashtra news amit shaha tour power presentation