सर्व बाजार समित्यांचे ऑडिट करणार - देशमुख

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 जून 2017

मुंबई - राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या कारभाराचे लवकरच ऑडिट करणार असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंगळवारी दिली.

मुंबई - राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या कारभाराचे लवकरच ऑडिट करणार असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंगळवारी दिली.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांच्यासह शंभरच्या आसपास लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देशमुख यांनी दिली. संबंधित कारवाई नियमानुसार झाल्याचे सांगून यामागे कोणतेही राजकारण नसल्याचा खुलासा त्यांनी केला. कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतकऱ्यांच्या आत्मा आहेत. मोठ्या विश्वासाने शेतकरी समित्यांशी जोडला गेला आहे. त्यांचा विश्वासघात करणाऱ्यांवर कारवाई करणारच, अशा शब्दांत देखमुख यांनी इशारा दिला. यापुढे राज्यातील सर्व बाजार समित्यांचे ऑडिट करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नोटाबंदीनंतर जिल्हा बॅंकांकडे असलेल्या जुन्या नोटांच्या रकमेबाबत रिझर्व्ह बॅंकेकडे सरकार पाठपुरावा करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: mumbai maharashtra news Audit of all market committees