मुंबईत 28 जूनपर्यंत लघुविमाने, ड्रोनवर बंदी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 मे 2017

मुंबई - दहशतवादी वा देशविघातक घटकांकडून असलेला हवाई आक्रमणाचा धोका लक्षात घेऊन 30 मे ते 28 जून या कालावधीत मुंबई हवाई क्षेत्र अतिलघुविमाने आणि ड्रोनसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. मुंबईच्या हवाई क्षेत्रात कोणत्याही प्रकारची अग्निअस्त्रे (एअर मिसाइल्स), पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलमार्फत उडवण्यात येणारी अतिलघु (मायक्रोलाइट) विमाने आणि ड्रोन उडवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलिस उपायुक्त (ऑपरेशन्स) रश्‍मी करंदीकर यांनी जारी केले आहेत.
Web Title: mumbai maharashtra news ban small aeroplane & dron