भामा आसखेड प्रकल्प लवकर सुरू करू - शिवतारे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 मार्च 2018

मुंबई - दौंड तालुक्‍यातील भामा आसखेड प्रकल्पाचे काम सुरू करण्याबाबत बैठक घेऊन काम मार्गी लावू, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.

मुंबई - दौंड तालुक्‍यातील भामा आसखेड प्रकल्पाचे काम सुरू करण्याबाबत बैठक घेऊन काम मार्गी लावू, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.

या संदर्भात सदस्य राहुल कुल यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. यावर उत्तर देताना शिवतारे म्हणाले, पुणे शहराची वाढती लोकसंख्या व शहराला लागणारे वाढीव पाणी याचा विचार करून मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्यात येईल. भामा आसखेड प्रकल्पाच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार या प्रकल्पाचे एकूण लाभक्षेत्र 23 हजार 110 हेक्‍टर आहे. या प्रकल्पाच्या 188.611 दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी वापरापैकी 141.486 दलघमी पाणी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, चाकण व लगतच्या 19 गावांना पिण्याचे पाणी वापरासाठी शासनाकडून वेळोवेळी आरक्षित केले आहे. यासाठी जलवाहिनीची सुविधा केली असून, याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुणे महापालिकेने 137 कोटींचा प्रस्ताव शासनाला पाठवावा. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. या चर्चेत सदस्य सर्वश्री अजित पवार, राहुल कुल यांनी सहभाग घेतला.

Web Title: mumbai maharashtra news bhama aaskhed project vijay shivtare