बुलेटप्रूफ जॅकेट निकृष्ट दर्जाची

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 मार्च 2018

मुंबई - मुंबई पोलिसांना पुरवण्यात आलेल्या 4 हजार 614 पैकी 1432 बुलेटप्रूफ जॅकेट निकृष्ट दर्जाची असल्याची कबुली गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधान परिषदेत आज दिली. कॉंग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केलेल्या नियम 93 च्या सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांच्या जॅकेटचा मुद्दा ऐरणीवर आला होता, मात्र अनेक जॅकेट खराब निघाल्याची बाब गाडगीळ यांनी सरकारच्या निदर्शनास आणली.

यावर उत्तर देताना डॉ रणजित पाटील म्हणाले, 'पाच हजार बुलेटप्रूफ जॅकेट पुरवण्याचे कंत्राट कानपूर येथील मेसर्स एम के यू प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले होते. सदर कंपनीने 4614 जॅकेटचा पुरवठा केला. चंडीगड येथील प्रयोगशाळेतील तपासणीत त्यापैकी 1432 जॅकेट निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले. आता ही जॅकेट बदलण्याची कार्यवाही सुरू आहे.''

Web Title: mumbai maharashtra news bulletproof jacket low quality