मौखिक कर्करोग धोरणासाठी प्रयत्न करणार - पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

मुंबई - राष्ट्रीय मौखिक कर्करोग धोरण देशासाठी अत्यावश्‍यक आहे. केंद्र सरकारने हे धोरण आणावे, यासाठी इंडियन डेंटल असोसिएशनला (आयडीए) मदत करण्याचे आश्‍वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दिले. मौखिक आरोग्य दिनानिमित्त आयडीएतर्फे मौखिक कर्करोग निवारणाबाबतच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आयडीएने ग्रामीण भागांत मौखिक कर्करोग निवारण योजना राबवाव्यात, असे मत पवार यांनी या वेळी व्यक्त केले.
Web Title: mumbai maharashtra news cancer policy sharad pawar