मुख्यमंत्र्यांचा अपघात हेलिकॉप्टर चालकामुळे

पीटीआय
शुक्रवार, 16 जून 2017

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला गेल्या महिन्यात झालेल्या अपघाताच्या प्राथमिक तपासाचा अहवाल विमान अपघात तपास यंत्रणेने (एएआयबी) आज नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे सुपूर्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अहवालातील माहितीनुसार, प्रथमदर्शनी या अपघातास हेलिकॉप्टर चालकास जबाबदार धरण्यात आले असून, हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या अतिरिक्त वजनाचा तसेच इंजिनाच्या तापमानाचा चालकाला अंदाज आला नाही. अशा स्थितीत त्याने हेलिकॉप्टरचे उड्डाण टाळायला हवे होते, मात्र तसे झाले नाही. काही उंचीवर जाताच ते कोसळले. शिवाय हेलिकॉप्टरसाठी आवश्‍यक मानल्या गेलेल्या आदर्श कार्यपद्धतीचे (एसओपी) चालकाकडून योग्यरीत्या पालन न झाल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. गेल्या महिन्यात 25 मे रोजी मुख्यमंत्री फडणवीस लातूर दौऱ्यावरून परतत असताना हा अपघात झाला होता. त्यातून ते बालंबाल बचावले होते. एएआयबी यंत्रणा ही नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
Web Title: mumbai maharashtra news chief minister helicopter accident by pilot