गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे संगणकीकृत करणार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

मुंबई - बोटांचे ठसे हे गुन्हे उकलण्याच्या प्रक्रियेतले सर्वांत मोठे साधन आहे, महाराष्ट्रात सुरू झालेल्या "सीसीटीएनएस' प्रणालीअंतर्गत सर्व गुन्हेगारांचे ठसे संगणकीकृत करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंगळवारी प्रश्‍नोत्तराच्या तासात दिली.

गुन्हेगार कित्येकदा नावे बदलून कृष्णकृत्ये करतात. संगणकीकृत प्रणाली त्यांची नावे तयार ठेवते पण बोटांचे ठसे हा सर्वोत्तम पुरावा असल्याने, ठसे जुळवण्यासाठी संगणकाचा वापर केला जाईल, असेही ते म्हणाले.

'अंधेरीतील सुभाष माने आणि डोंबिवलीतील विक्रांत केणे यांच्या हत्येबाबत हे प्रश्‍न विचारले गेले होते. नव्या काळात सीसीटीव्ही तसेच अन्य यंत्रणांचा वापर करून लक्ष ठेवले जाते. त्यातून या गुन्ह्यांची उकल केली जाईल. रस्त्यावर उभे राहून लक्ष ठेवण्याची पद्धत आता बदलली आहे, त्यामुळे तंत्रज्ञानावर आधारित तपास यंत्रणा यावर भर दिला जाणार आहे. सीसीटीव्हीमुळे ररस्त्यावर घडणारे गुन्ह्यांचा तपास लावणे सोपे ठरणार आहे,'' असे मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: mumbai maharashtra news Computerizing fingerprints of criminals