राजकीय विरोधकांची दिलजमाई

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 28 जानेवारी 2018

मुंबई - संविधान बचाव रॅलीच्या निमित्ताने कट्टर राजकीय विरोधकांत दिलजमाई झाल्याचे चित्र असून, परस्परांवर कुरघोडीचं राजकारण करणाऱ्या या नेत्यांमध्ये एकोपा वाढत आहे. संविधान यात्रेच्या निमित्त एकत्र आलेल्या या विरोधकांनी भाजप सरकारविरोधात ऐक्‍य करत सत्ता बदलाचा नारा दिला आहे. या रॅलीमध्ये मोदी हटाव देश बचावच्या घोषणा देण्यात आल्या. 

मुंबई - संविधान बचाव रॅलीच्या निमित्ताने कट्टर राजकीय विरोधकांत दिलजमाई झाल्याचे चित्र असून, परस्परांवर कुरघोडीचं राजकारण करणाऱ्या या नेत्यांमध्ये एकोपा वाढत आहे. संविधान यात्रेच्या निमित्त एकत्र आलेल्या या विरोधकांनी भाजप सरकारविरोधात ऐक्‍य करत सत्ता बदलाचा नारा दिला आहे. या रॅलीमध्ये मोदी हटाव देश बचावच्या घोषणा देण्यात आल्या. 

केंद्र सरकार घटनेची पायमल्ली करीत असल्याच्या मुद्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआयचे विविध गट आणि डाव्या पक्षांनी एकत्र येत संविधान बचाव रॅलीचे काल आयोजन केले होते. खासदार राजू शेट्टी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शरद यादव, डी. राजा, ओमर अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अजित पवार, खा. राजू शेट्टी, जोगेंद्र कवाडे, अर्जुन डांगळे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे - पाटील, धनंजय मुंडे आदी नेते रॅलीत सहभागी झाले होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला साथ देणारे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते अर्जुन डांगळे हे शिवसेनेचा हात झटकून पुरोगामी आघाडीच्या कळपात सामील झाले. कवाडे यांच्याबरोबर रिपाईचे अन्य गटही रॅलीत सहभागी 
झाले होते. 

मंत्रालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरवात झाली. या रॅलीला मुंबई पोर्ट ट्रस्टने परवानगी नाकारली होती. मात्र ही रॅली मूक असून कोणतीही भाषणे होणार नसल्याचे सांगण्यात आले. तसेच सरकारचा कार्यक्रम संध्याकाळी असून त्यापूर्वी ही रॅली संपणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर रॅलीला परवानगी 
देण्यात आली.

रॅलीने पवार-विखेंचे सुरात सूर 
संविधान बचाव रॅलीसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा बंगला केंद्रबिंदू ठरला आहे. विरोधी पक्षातील प्रमुख नेते बंगल्यावर जमलेले असताना शरद पवारही बंगल्यावर हजर झाले आणि राधाकृष्ण विखे पाटलांना सुखद धक्का बसला. गेली काही वर्षे पवार आणि विखे - पाटील घराण्यात संघर्ष सुरू आहे. अजित पवार यांनी नगर जिल्ह्यातील मुळा प्रवरा सहकारी वीज कंपनी बरखास्त केली होती. तेव्हापासून हे वैर अधिकच वाढले होते. मात्र आज शरद पवार विखेंच्या बंगल्यावर आल्याने ही कटुता काहीशी कमी झाल्याची चर्चा रंगली.

Web Title: mumbai maharashtra news Constitution rescue rally