'जीएसटी' मुदतवाढीबाबत मागणी करणार - मुनगंटीवार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

मुंबई - देशभरात जीएसटीच्या विरोधात असंतोष निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारला जाग आली. राज्यातील लहान व मध्यम व्यापाऱ्यांकरिता जीएसटीअंतर्गत विवरणपत्र दाखल करण्याचा कालावधी एक महिन्यावरून तीन महिने करण्याबाबत जीएसटी कौन्सिलमध्ये मागणी करणार असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

जीएसटी अंतर्गत प्रत्येक व्यापाऱ्याने प्रत्येक महिन्यात त्याच्या विक्री, खरेदीचा पूर्ण तपशील, तसेच तपशिलावर आधारित विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लहान व मध्यम उलाढाल असलेल्या व्यापाऱ्यांनी या संदर्भात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन प्रत्येक महिन्यात सर्व तपशील भरणे ही अधिक कालापव्यय करणारी व खर्चिक बाब आहे, असे निवेदन देत भूमिका विशद केली. व्यापारी बांधवांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करत मुनगंटीवार यांनी त्यांच्या प्रतिनिधींना जीएसटीअंतर्गत सर्व व्यापाऱ्यांनी करासंदर्भात अनुपालन करणे आवश्‍यक आहे असे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी छोट्या व मध्यम व्यापाऱ्यांचा जीएसटीअंतर्गत अनुपालन खर्च कमी करण्याच्या दृष्टीने प्रत्येक महिन्याऐवजी त्रैमासिक विवरण भरण्याचे प्रावधान जीएसटी कायद्यांतर्गत करावे, अशी मागणी येत्या 6 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या वस्तू व सेवाकर परिषदेत करण्याची ग्वाही मुनगंटीवार यांनी दिली.

Web Title: mumbai maharashtra news Demand for extension GST