पाणीविषयक प्रश्नांना मुख्यमंत्री देणार उत्तरे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 जून 2017

मुंबई - राज्यातील जनतेला थेट मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या "मी मुख्यमंत्री बोलतो' कार्यक्रमाच्या पाणी या विषयावरील पहिल्या भागाचे येत्या रविवारी (ता. 11) सकाळी विविध दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून प्रसारण होणार आहे.

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे निर्मित या कार्यक्रमाचे प्रसारण रविवारी दूरदर्शनची सह्याद्री वाहिनी, झी 24 तास आणि साम टीव्ही या वाहिन्यांवरून सकाळी दहा वाजता होईल. याच कार्यक्रमाचे पुन:प्रसारण सोमवारी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून सायंकाळी 5.30 वाजता होईल. तर आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरून या कार्यक्रमाचे प्रसारण सोमवारी आणि मंगळवारी सकाळी 7. 25 वाजता होईल.

Web Title: mumbai maharashtra news devendra fadnavis answer to water issue question