ठाकरेंच्या आदेशानुसारच माझी भूमिका - रावते

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 जून 2017

मुबई - शिवसेनेला कर्जमाफीची घोषणा मान्य नाही, अशा वावड्या उठत असतानाच परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संमतीनुसारच बोलत असतो. त्यामुळे आपली भूमिका ही शिवसेनेची अधिकृत भूमिका असल्याचे जाहीर केले आहे.

शिवसेनेला आज भाजपच्या मंत्र्यांनी टीकेचे लक्ष्य केले असतानाच रावते यांनी मात्र कर्जमाफीच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांची पूर्णतः मान्यता असल्याचे घोषित केले. ते म्हणाले की, मी उच्चाधिकारी समितीतला शिवसेनेचा अधिकृत प्रतिनिधी आहे. शासनाच्या निर्णयाला आमची मान्यता आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहा हजार रुपयांची उचल देण्याचा आग्रह मी धरला. मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भाचे अधिकार रामदास कदम यांनी पुढाकर घेऊन दिले. त्यामुळेच हा निर्णय प्रत्यक्षात आला.

Web Title: mumbai maharashtra news divakar ravate talking