आता चर्चा नको; मराठ्यांना आरक्षण द्या! - धनंजय मुंडे

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मुंबई - मराठा आरक्षणावर आता आम्हाला चर्चा करायची नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे, असे सांगत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आज विधान परिषदेत सरकारवर कडाडले. शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच मराठा आरक्षणावर चर्चा व्हावी अशी मागणी केली असता, त्यावर मुंडे यांनी सरकारबरोबर मेटे यांनाही खडे बोल सुनावले.

आरक्षणावर चर्चा करण्याची मागणी काय करता, आता चर्चा नको, मराठा आरक्षण हवे आहे. डिसेंबर 2014 पासून मराठा आरक्षणावर अनेकदा चर्चा झाल्या आहेत. त्यामुळे उद्या राज्यातून लाखोंच्या संख्येने सहभागी होणारे मराठा हे सभागृहात आरक्षणाची चर्चा व्हावी म्हणून मोर्चात सहभागी होत नाहीत, तर त्यांना आता सरकारने मराठा आरक्षण जाहीर करण्याच्या मागणीसाठी येत आहेत. त्यामुळे आता चर्चा नको, असे सांगत मुंडे यांनी मेटे यांच्या मागणीवर जोरदार आक्षेप घेतला.

आरक्षण देत नसाल तर तुम्ही सत्तेत असून, चर्चा कसली मागता, असा सवालही मुंडे यांनी मेटे यांना केला. त्या दरम्यान, सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हा विषय कोणत्या मुद्यांवर विचारला जात आहे, असा सवाल करत प्रश्नोत्तरे पुकारली. त्याचवेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घोषणाबाजी झाल्यामुळे सभापतींनी सभागृहाचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब केले.

Web Title: mumbai maharashtra news Do not discuss now; Reservation for Marathas!