मुंबई-पुणे 'एक्‍स्प्रेस वे'वर 80 किमीपेक्षा कमी गती नको

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 मार्च 2018

मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वेगाची किमान मर्यादा निश्‍चित केली आहे. आता या मार्गावर ताशी 80 कि.मी.पेक्षा कमी गतीने वाहन चालवता येणार नाही, अशी अधिसूचना जारी करण्यात आली.

द्रुतगती मार्गावरील तीन लेनपैकी कार, जीप, टेंपो या हलक्‍या वाहनांनी मार्गाच्या मधल्या लेनमधून आणि अवजड वाहनांनी सर्व्हिस लेनला लागून असलेल्या डावीकडील लेनमधून; तर केवळ पुढील वाहनाच्या पुढे जाताना उजवीकडील लेनचा वापर करणे अपेक्षित आहे. इतर वेळी उजवीकडील लेन कायम रिकामी ठेवणे आवश्‍यक आहे.

उजवीकडील लेन एखाद्या वाहनाच्या पुढे जाण्यासाठी राखीव असल्याने पहिल्या लेनमधून प्रवास करताना आवश्‍यक असणारी गती ताशी 80 कि.मी.पेक्षा कमी असल्यास पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांना अडथळा निर्माण होऊन अपघात होतात, असे पोलिसांच्या लक्षात आले आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी, अपघात रोखण्यासाठी; तसेच लेनच्या शिस्तीचे पालन व्हावे, यासाठी वेगाच्या बाबतीत किमान गती ठेवण्यासाठी ही अधिसूचना काढण्यात आली. यातून अत्यावश्‍यक सेवेची वाहने, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने, पोलिस आणि सरकारी वाहनांना वगळण्यात आल्याची माहिती अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) आर. के. पद्मनाभन यांनी दिली.

Web Title: mumbai maharashtra news express way speed