राज्यातील मासेमारी एक जूनपासून बंद

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 30 मे 2017

मुंबई - राज्यातील मासळी साठ्यांचे जतन आणि मच्छीमारांचे जीवित व वित्त यांचे रक्षण करण्यासाठी एक जून ते 31 जुलै 2017 या कालावधीत सागरी किनारपट्टीपासून बारा मैलापर्यंत यांत्रिकी मासेमारी नौकास पावसाळी मासेमारी बंदी घालण्यात आलेली आहे.

पावसाळी मासेमारी बंदी ही फक्त यांत्रिकी मासेमारी करण्याऱ्या नौकांना लागू असणार आहे. पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगरयांत्रिकी नौकांना ही बंदी लागू राहणार नाही. बंदी कालावधीच्या दरम्यान यांत्रिकी मासेमारी नौका मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी अधिनियमअंतर्गत गलबत जप्त करून, त्यात पकडलेली मासळी जप्त करण्यात येणार आहे. एक जूनपूर्वी मासेमारीस गेलेल्या नौकांना एक जूननंतर कोणत्याही परिस्थितीत बंदरात मासे उतरविण्यास परवानगी नसून अशा नौकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाने कळवले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai maharashtra news fishing close from 1st june