शेतकऱ्यांना दिलेली आश्‍वासने पाळा - संजय राऊत

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 2 जून 2017

मुंबई - सरकारच्या धोरणांविरोधात शेतकरी संपावर गेले असतानाच शिवसेनेने पुन्हा एकदा विरोधी भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना दिलेली आश्‍वासने पूर्ण करा, अशी मागणी शिवसेनेचे प्रवक्‍ते संजय राऊत यांनी केली आहे. संपकरी शेतकऱ्यांवर आज ठिकठिकाणी झालेल्या कारवाईचा संदर्भ देत त्यांनी शेतकऱ्यांना मारहाण करणे योग्य नाही, अशी भूमिका घेतली आहे. शिवसेनेने या संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय अप्रत्यक्षरीत्या घेतला आहे. संपाला पाठिंबा देण्यासाठी विविध संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना मदत करण्याचे धोरण शिवसेनेने अवलंबिले आहे असे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात विचारले असताना त्यांनी काही जणांना आपण सत्तेत आहोत हे समजत नाही. त्यांना जबाबदारीही कळत नाही, पण आम्हाला ती कळते असा टोला लगावला.
Web Title: mumbai maharashtra news Follow the promises given to the farmers