गोंदियात कॉंग्रेस-भाजपचा राष्ट्रवादीला दणका

संजय मिस्कीन
मंगळवार, 16 जानेवारी 2018

मुंबई - देशभरात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधी पक्षाची आघाडी होत असताना गोंदिया जिल्हा परिषदेत मात्र भाजप व कॉंग्रेस अशी आघाडी झाली आहे. आज जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या पाठिंब्याने कॉंग्रेसचा, तर उपाध्यक्षपदी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर भाजपचा उमेदवार विजयी करण्याची राजकीय कुरघोडी करण्यात आल्याने राष्ट्रवादीने टोकाची नाराजी व्यक्‍त केली आहे.

गोंदियात कॉंग्रेसचे गोपाळदास अग्रवालविरुद्ध राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल या दोन्ही नेत्यांमध्ये टोकाचा संघर्ष आहे. 2015 मध्ये या जिल्हा परिषदेची निवडणूक झाली होती. त्या वेळी भारतीय जनता पक्षाला मोठा फटका बसला होता. तरीही कॉंग्रेसने भाजपची कास धरत राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवले होते.

आज अडीच वर्षांनंतर अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड झाली. यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी आघाडी करण्याचे आदेश दिले होते; मात्र ऐनवेळी कॉंग्रेस व भाजप आघाडी झाल्यानेन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. कॉंग्रेसने इथे विश्‍वासघात केल्याचे सांगत समविचारी पक्षांच्या सोबत कॉंग्रेसला आघाडी करण्याची आवश्‍यकता वाटत नाही काय? असा सवाल केला.

दरम्यान, भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागणार आहे. भाजप आमदार नाना पटोले यांनी राजीनामा देत कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने ही पोटनिवडणूक होत आहे; मात्र आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून, प्रफुल्ल पटेल तिथून निवडणूक लढवत असतात; पण आघाडीच्या सूत्रांनुसार, विरोधी पक्षातला विद्यमान आमदार अथवा खासदार ज्या पक्षात जाईल त्या पक्षाला जागा सोडण्याचे धोरण आहे. अशा स्थितीत आता राष्ट्रवादी या मतदारसंघावरचा दावा सोडण्याची शक्‍यता कमी असून, कॉंग्रेसची कसोटी लागणार आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना तटकरे म्हणाले, की दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसूनच या पोटनिवडणुकीत कोणत्या पक्षाचा उमेदवार असावा यावर निर्णय घ्यावा लागेल.

Web Title: mumbai maharashtra news gondia zp election