दोन्ही हेलिकॉप्टर कंपन्यांचे करार रद्द

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 जुलै 2017

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा हेलिकॉप्टर अपघाताला सामोरे जाण्याचा दुर्दैवी प्रकार घडल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. राज्य सरकारला भाडेतत्त्वावर हेलिकॉप्टर सेवा पुरवणाऱ्या दोन्ही कंपन्यांचे करार सरकारने आज तडकाफडकी रद्द केले.

ऍडोनिस व अलॉफ्ट या दोन कंपन्यांकडून सरकार हेलिकॉप्टरची सेवा घेत होते. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या हेलिकॉप्टरच्या पायलटमुळे मुख्यमंत्र्यांना दोनदा अपघाताला सामोरे जावे लागले. लातूर येथील अपघातातून तर मुख्यमंत्री सुदैवानेच बचावले होते, तर रायगडमध्ये मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये बसतानाच ते उडाल्याची घटना घडली. मुख्यमंत्र्यांसारखी अत्यंत महत्त्वाची व्यक्‍ती ज्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करते ते हेलिकॉप्टर सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण असायला हवे. पायलट हे अत्यंत कुशल व अनुभवी असायला हवेत.

आज या दोन्ही कंपन्यांसोबतचा करार रद्द करताना जोपर्यंत हेलिकॉप्टरमध्ये चढण्याचा व उतारण्याचा राजशिष्टाचार तयार होत नाही, तोपर्यंत खासगी कंपन्यांसोबत हेलिकॉप्टरचा करार करण्यात येणार नाही, अशी भूमिकाच सरकारने आज घेतली आहे.

Web Title: mumbai maharashtra news helicopter company agreement cancel