माण, कोरडा नदीतील बंधारे भरून घ्या - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 28 मार्च 2018

मुंबई - सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्‍यातील माण आणि कोरडा नदीतील बंधारे सिंचनाच्या दृष्टीने येत्या पावसाळ्यात भरुन घ्यावेत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

विधानभवनात आज यासंदर्भात बैठक झाली, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख, जलसंपदा विभागाचे सचिव (प्रकल्प समन्वय) आर. व्ही. पानसे आदी उपस्थित होते.

सांगोला तालुक्‍याची दुष्काळी परिस्थिती पाहता, तसेच माण आणि कोरडा नद्यांमधील बंधारे कधीच भरलेले नसल्याचे स्थिती पाहता म्हैसाळ व टेंभू प्रकल्पांमधून हे बंधारे भरून घ्यावेत. तसेच हे पाणी सिंचनासाठी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी आमदार गणपतराव देशमुख यांनी या वेळी केली. माण नदीवर कोल्हापूर पद्धतीचे 45 तर कोरडा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे 14 बंधारे आहेत.

Web Title: mumbai maharashtra news man korada river dam water chief minister