मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीनंतर? - चंद्रकांत पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

मुंबई - राज्याच्या मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात फेरबदल होणार असून, ज्यांना आजपर्यंत संधी मिळाली नव्हती अशा आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मंत्रालयात पत्रकारांशी ते बोलत होते. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार दिवाळीनंतर होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली असता मुख्यमंत्र्यांनी राणे यांनी "एनडीए'मध्ये येण्याचे आवाहन केले. राणे यांनी दोन दिवसांत निर्णय घेतो, म्हणून सांगितले आहे. "एनडीए'मध्ये सामील होण्याचा निर्णय राणे यांनी जाहीर केल्यानंतर पुढील गोष्टी होतील. त्या ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ""मी माझ्याकडील महसूल खाते राणे यांना देणार, असे कधीच म्हटले नाही. संघटनेसाठी मी काहीही करायला तयार आहे,'' असे सांगत पाटील यांनी राणे यांना महसूल खाते देण्यास अप्रत्यक्ष विरोध दर्शवला.

"एनडीए'मध्ये राणे येणार म्हणून कुठलीही नाराजी भाजप आमदारांमध्ये नाही. मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होईल. त्यात अनेकांना आजपर्यंत संधी न मिळालेल्या आमदारांचा समावेश असेल, असेही पाटील म्हणाले. मुख्यमंत्री शिवसेनेच्या मंत्र्यांना खूप वेळ देत असताना शिवसेनेच्या मंत्र्यांनी बाहेर बोलणे टाळले पाहिजे, असा सल्लाही पाटील यांनी या वेळी दिला.

दरम्यान, राणे यांचा एनडीएमध्ये निश्‍चित समावेश होणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राणे यांनी महसूल, गृहनिर्माण किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याची मागणी केल्याचे समजते. महसूल न मिळाल्यास गृहनिमार्ण खात्यासाठी राणे यांचा जास्त आगृह असल्याचे समजते. राणे यांनी एनडीएत सामील होण्याची घोषणा केल्यानंतर लागलीच मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत; मात्र ही प्रक्रिया दिवाळीनंतर होणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: mumbai maharashtra news mantrimandal expansion after diwali